Admin
चेतन ननावरे,मुंबई
13 मार्चपासून आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. योग्य निर्णय होई पर्यंत लढा सुरूच राहणार असे मत युनियनचे राज्य अध्यक्ष दिलीप उटाणे यांनी व्यक्त केले. राज्यातील नियमीत आरोग्य सेविकांच्या रिक्त पदावर १५ वर्षांपासून सेवा देणाऱ्या कंत्राटी आरोग्य सेविका व धिपरिचारीकांना सामावून घ्यावे, नंतच पद भरती घेण्यात यावे अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे.
समान काम समान वेतन लागू करा, उच्च न्यायालय औरंगाबाद निर्णयानुसार राज्यातील १० वर्ष पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा नियमित करुन सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरु असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.