ताज्या बातम्या
आज एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर आंदोलन
आज एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.
आज एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेकडून आज राज्यभर निदर्शने करण्यात येणार आहेत.
मुंबईमध्ये सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार असून आपल्या प्रलंबित आर्थिक व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटना राज्यभर आंदोलन करणार आहे.
कामगारांची उरलेली थकबाकी त्वरित देण्यात यावी, महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा टक्क्यांवरुन कर्मचारी आक्रमक झाले आहेत. पूर्वीप्रमाणेच 5 रुपयांच्या पटीत सुधारित भाडेवाढ लागू करावी, अशी मागणी देखील एसटी कामगार संघटनेने केली आहे.