गृहिणींचं बजेट कोलमडणार; आता डाळी आणि कडधान्येही महागली

गृहिणींचं बजेट कोलमडणार; आता डाळी आणि कडधान्येही महागली

महागाईचा वाढता आलेख थांबण्याचे नावच घेत नाही आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महागाईचा वाढता आलेख थांबण्याचे नावच घेत नाही आहे. या वाढत्या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. भाज्याचे दर वाढले आहे. अनेक भाज्या या 100 ते 120 रुपये किलो झाल्या आहेत. यातच आता डाळी, कडधान्येही महागलीव आहेत. यासर्व महागाईमुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.

तूरडाळीच्या दरात वाढ झाली आहे. तूरडाळीचे दर 120 ते 140 रुपये किलोवर पोहोचले आहे, तर कडधान्यांनेही शंभरी पार केली आहे. मूगडाळ 108 ते 121 रुपये किलो, उडीद डाळ 110 ते 130 रुपये किलो, चणाडाळ 68 ते 75 रुपये किलो, मसूर डाळ 78 ते 86 रुपये किलो झाली आहे. वाल 240 ते 250 रुपये किलो, काबुली चणे 120 ते 140 रुपये किलो झाले आहेत. यासोबतच अख्खा मूग बाजारात 100 ते 120 रु. किलो, मटकी 110 ते 130 रु. किलो, पांढरा वाटाणा 64 ते 72 रु. किलो, लाल चणा 60 ते 75 रु. किलो, काबुली चणा 120 ते 140 रु. किलो रुपयांनी महाग झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com