पुणे शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर; AI तंत्रज्ञानावर आधारित 2,866 कॅमेरे बसवणार
अमोल धर्माधिकारी, पुणे
पुणे शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. AI तंत्रज्ञानावर आधारित शहरात 2,866 कॅमेरे बसवणार असल्याची माहिती मिळत आहे. पुणे शहरातील वाढते गंभीर गु्न्हे, सराईतांच्या हालचाली टिपण्यासाठी म्हणून हे कॅमेरे बसवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुणे पोलिसांकडून हे आर्टीफिशयल इंटेलिजन्स सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी राज्य सरकारकडून 433 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
या कॅमेराच्या माध्यमातून आता गुन्हेगार दिसला की पोलिसांना अलर्ट देखील मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. एआय तंत्रज्ञानावर आधारित 2 हजार 866 कॅमेरे बसविणार आहेत.
या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार असून त्यामुळे आता वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवता येणार आहे.