Pune : चित्रपटात काम मिळवून देण्याचं आमिष दाखवत मुलीवर लैंगिक अत्याचार

Pune : चित्रपटात काम मिळवून देण्याचं आमिष दाखवत मुलीवर लैंगिक अत्याचार

पुण्यात चित्रपटात अभिनयाच काम मिळवून देण्याचं अमिष दाखवत पुण्यात एका डान्स टीचरने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

चंद्रशेखर भांगे, पुणे

पुण्यात चित्रपटात अभिनयाच काम मिळवून देण्याचं अमिष दाखवत पुण्यात एका डान्स टीचरने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या एका परिसरात आरोपीचे डान्स क्लासेस आहेत.

पिडीत तरुणी ही या डान्स क्लासमध्ये नेहमी डान्स शिकण्यासाठी जात होती. तरुणीला चित्रपटात अभिनयाचा आमिष दाखवत बत्तीस वर्षे डान्स टीचर ने तिला पुण्याजवळ असलेल्या चांभळी गावातील एका लॉजवर नेत लैंगिक अत्याचार केला.

आरोपीने मुलीच्या आई-वडिलांना विश्वासात घेऊन मुलीला अभिनय करण्यासाठी बाहेरगावी घेऊन जात आहे असे सांगून थेट लॉजमध्ये नेऊन केला लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे. बत्तीस वर्षीय नराधम आरोपी विरोधात पुण्यातील हडपसर पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com