राज्यपालांविरोधात आज पुणे बंदची हाक
Admin

राज्यपालांविरोधात आज पुणे बंदची हाक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुणे बंदची हाक दिली आहे. यासाठी पोलिसांनी सुमारे साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. भगतसिंह कोश्यारीच्या वक्तव्याविरोधात आजच्या पुणे बंदमध्ये अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे.

आज सकाळी 9.30 वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूकमोर्चास प्रारंभ होणार आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. गृहरक्षक दलाचे जवान, शहर पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, यांच्यासह स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखेची पथकांचा बंदोबस्त या मोर्च्याच्या वेळी असणार आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं देखील या मोर्च्यावर लक्ष ठेवणार आहे.

या मोर्च्यात छत्रपती उदयनराजे महाराज, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी नेते सहभागी होणार आहेत तसेच ते जाहीर सभेतही बोलणार आहेत. यात स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित असणार आहे. पुणे बंदच्या वेळी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात मोठा बंदोबस्त असणार आहे. या बंद दरम्यान संपूर्ण शहरात सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी सुमारे 100 वरिष्ठ अधिकारी, 1000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com