'सावधान नवले ब्रीज पुढे आहे; नवले ब्रिजवर जनजागृती करण्यासाठी लागले हटके बॅनर

'सावधान नवले ब्रीज पुढे आहे; नवले ब्रिजवर जनजागृती करण्यासाठी लागले हटके बॅनर

पुण्यातील नवले पुलावर गेल्या दोन दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरू आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुण्यातील नवले पुलावर गेल्या दोन दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरू आहे. दिवसेंदिवस नवले पुल हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. रविवारी रात्री झालेल्या अपघातामध्ये ट्रकने ४८ गाडयांना धडक दिली. त्यानंतर त्याच रात्री देखील पुन्हा दोन अपघात झाले. त्यामुळे प्रवाशांमध्ये जनजागृती व्हावी या साठी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादीकडून नाऱ्हे सेल्फी पॉइंट येथे "सावधान, पुढे नवले पूल आहे" अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्या वतीने हे बनार लावण्यात आले आहे. जांभुळवाडी तलावापासून ते नऱ्हे येथील सेल्फी पॉईंट पर्यंत हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.सोशल मीडियावर या बॅनर ची चांगलीच चर्चा रंगू लागली.कात्रज बोगद्यापासून थेट नवले पुलापर्यंत तीव्र स्वरूपाचा उतार असून अनेकदा मोठे वाहन चालक गाडी बंद करून अथवा न्युट्रल करून चालवतात.त्यामुळे अनेकदा वाहनाचे ब्रेक लागत नाहीत. आणि त्यामुळे मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com