ताज्या बातम्या
Pune Crime : सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी आणि पुतण्याची केली हत्या; स्वतःलाही संपवलं
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
चंद्रशेखर भांगे, पुणे
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यात एका सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी आणि पुतण्याची हत्या करुन स्वतःला संपवलं आहे. अमरावती पोलीस दलात कार्यरत असलेल्या या सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केली आहे.
भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात राहत होते. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.