Pune Porsche Car Accident
Pune Porsche Car Accident

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण; सायबर सेलने रिल क्रिएटरच्या मुसक्या आवळल्या, व्हिडीओ बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात नव नवीन खुलासे समोर येत असतानाच पुणे सायबर सेलनेही या प्रकरणात उडी घेतली आहे.
Published by :

Pune Hit And Run Case Update : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात नव नवीन खुलासे समोर येत असतानाच पुणे सायबर सेलनेही या प्रकरणात उडी घेतली आहे. आरोपीचा बनावट व्हिडीओ केल्याप्रकरणी सायबर सेलने रिल क्रिएटरवर गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलाचाही रॅप साँगचा बनावट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशातच आता सायबर सेलने अशाप्रकारचे फेक व्हिडीओ बनवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

बनावट व्हिडीओच्या माध्यमातून आरोपीची सुटका करण्याची मागणी करण्यात आली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पुण्याच्या सायबर सेलनं व्हिडीओ बनवणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. कलम ५०९,२९४ ब आणि आयटी अॅक्टच्या ६७ कलमांतर्गत पुणे पोलिसांच्या सायबर सेलने आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com