Deenanath mangeshkar hospital : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! 'त्या' मुलींच्या उपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून
पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एका गर्भवती महिलेचा योग्य वेळी उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. प्रसूतीसाठी दाखल करण्यास रुग्णालयाने 10 लाख रुपये मागितले. मात्र तितके पैसे भरण्यासाठी नसल्याने योग्य ते उपचार मिळाले नाहीत. दरम्यान त्या महिलेला जुळ्या मुली झाल्या आणि तिचा मृत्यू झाला. आता या दोन्ही मुलींचे उपचार मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. तसेच या प्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणारच असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.
जन्माला आलेल्या दोन्ही मुली या एनआयसीयूत भरती आहेत. त्यांचा उपचाराचा खर्च जास्त असून तो कुटुंबाला न परवडणारा आहे. आठव्याच महिन्यात बाळंतपण झाल्याने त्या दोन्ही मुलींना काही दिवस एनआयसीयूत ठेवावे लागणार आहे. दरम्यान पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.