ताज्या बातम्या
Pune Ganeshotsav : ढोल ताशाच्या गजर, रांगोळ्यांच्या पायघड्या, लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज
दहा दिवसाचा उत्साहात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर भाविक आज लाडक्या गणरायाला जड अंतकरणाने निरोप देणार आहे.
दहा दिवसाचा उत्साहात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर भाविक आज लाडक्या गणरायाला जड अंतकरणाने निरोप देणार आहेत. अनंत चतुर्दशी निमित्त ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत विसर्जन करण्यात येणार आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी आता पुणेकर सज्ज झाले आहेत.
अनंत चतुर्शदशीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर सज्ज झालं आहे. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील महत्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीसाठीदेखील सध्या जोरदार तयारी सुरु आहे. पुण्यातील अनेक मानाच्या गणपतीच्या मिरवणूक निघणार आहे.
ढोल ताशाच्या गजरात, रांगोळीच्या पायघड्या घालून, प्रत्येक मानाच्या आणि महत्वाच्या गणपतीसमोर ढोल ताशा पथकं वादनासाठी सज्ज होत आहे. दगडूशेठ गणपती मंडळ चार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी पोलिस मोठ्या प्रमाणावर सज्ज झाले आहेत.