पुण्यात मध्यरात्री अग्नितांडव; गॅस पाईपलाईन लिक झाल्याने मोठा स्फोट
Admin

पुण्यात मध्यरात्री अग्नितांडव; गॅस पाईपलाईन लिक झाल्याने मोठा स्फोट

पुण्यातील सिहंगड रस्त्यावर असणाऱ्या राजाराम पुलाजवळ एमएनजीएल गॅस पाईपलाईनला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.

पुण्यातील सिहंगड रस्त्यावर असणाऱ्या राजाराम पुलाजवळ एमएनजीएल गॅस पाईपलाईनला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं सिंहगड रोडवरील या भागातील एका बाजुची वाहतूक थांबवण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूने वाहने जात आहेत. दरम्यान एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच तेही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ही घटना काल रात्री 12 च्या सुमारास घडल्याचे बोलले जात आहे. गॅस पाईपलाईन फुटल्यामुळे जमिनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत दिसत होत्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. एमएनजीएलचे मुख्य अधिकारी व कर्मचारी दाखल होऊन त्यांनी संबंधित विविध लाईन बंद केले आहेत. यामुळे मोठा धोका टळला आहे.

यामध्ये अद्याप कुठलीही जीवितहानी झालेली नाही. खोदकाम सुरू असल्यामुळे गॅसची लाइन लीक झाली आणि हा स्फोट झाला. यामुळे उद्या पुण्याच्या दक्षिण भागांमध्ये पुरवठा बंद राहणार आहे. तातडीने अग्निशामक दलाच्या 3 गाड्याना पाचारण करण्यात आले होते. ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, पाईपमधून गॅसचा प्रवाह सुरु असल्याने आग आटोक्यात येत नाही. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्ननंतर आग आटोक्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com