पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होणार

पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होणार

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
Published by :
Siddhi Naringrekar

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

याच पार्श्वभूमीवर आता अल्पवयीन आरोपीला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे. मारहाण करणारे सहा जण पोलिसांच्या रडारवर आहेत.

अपघातानंतर आरोपीला सहा जणांनी मारहाण केली होती. याच पार्श्वभूमीवर आता त्या सहा जणांवर कारवाई होणार आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांकडून आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com