Pune Hit And Run Case: पुणे हिट अँड रन प्रकरण; अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

Pune Hit And Run Case: पुणे हिट अँड रन प्रकरण; अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात (५ जूनपर्यंत) ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय बाल हक्क मंडळाने दिला होता. या प्रकरणात अल्पवयीनचा जामीन रद्द करण्यात आला. त्यानंतर त्याला रिमांड होममध्ये ठेवण्याचा निर्णय घोषित करण्यात आला. संपूर्ण तपास होईपर्यंत त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात येणार होते. तपास पूर्ण झाल्यानंतर अल्पवयीन अज्ञान आहे की सज्ञान याबाबत निर्णय घेतला जाणार होता.

पुणे अपघात प्रकरणी आणखी एक नुकतीच मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई हायकोर्टाकडून अल्पवयीन मुलाला जामीन मंंजूर करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com