पुणे हिट अँड रन प्रकरण; सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवालची कोठडी आज संपणार

पुणे हिट अँड रन प्रकरण; सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवालची कोठडी आज संपणार

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
Published on

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. याच पुणे हिट अँड रन प्रकरणात सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवालची कोठडी आज संपणार आहे.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील कार चालकाला डांबून ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची पोलीस कोठडी आज संपत आहे.

अपघातात अल्पवयीन मुलाने कार चालवली असतानाही अग्रवालने चालकाला स्वतः कार चालवत होता असे पोलिसांना सांग असे धमकावले आणि डांबून ठेवल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com