मराठी भाषेवरुन पुन्हा वाद पेटला, डी-मार्टमध्ये हिंदी भाषिकाची मुजोरी
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेचा वाद मोठ्या प्रमाणात पेटला आहे. अनेक ठिकाणी मराठी भाषेला दुय्यम दर्जा डीला जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच वाईट वागणूक मिळत असल्याने आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये हिंदी भाषिकांची मुजोरी बघायला मिळाली. अशातच आता पुण्यातून एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पुण्यातील वाघोली डी-मार्ट येथील एक माणूस मराठी बोलण्यास सांगत आहे. डी-मार्टमध्ये असलेला दूसरा व्यक्ती त्याला हिंदीमध्येच बोलणार मराठीमध्ये नाही असे सांगत आहे. यावरुन दोघांमध्ये शाब्दिक वादावादीदेखील होते. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत लिहिले की, "महारक्षत्रात राहणाऱ्या परप्रांतीयांना अजिबात दयामाया दाखवू नका. ही माणसं तोंडावर कितीही गोड बोलले तरीही पाठीमागून यांची लायकी दाखवतात. मराठी माणसा जागा हो". दरम्यान आशा प्रतिक्रिया देत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.