Admin
ताज्या बातम्या
पुणे-मुंबई डेक्कन क्वीनला 93 वर्ष पूर्ण
पुणे-मुंबई डेक्कन क्वीनला आज 93 वर्ष पूर्ण झाली आहेत.
पुणे-मुंबई डेक्कन क्वीनला आज 93 वर्ष पूर्ण झाली आहेत. पुणे रेल्वे स्थानकात आज या डेक्कन क्वीनचा वाढदिवस सोहळा पार पडला. गाडीला फुलांनी आणि फुगे लावून सजवण्यातही आलं होतं.
डेक्कन क्वीनचा वाढदिवस सोहळा पार पडत असताना पुणे रेल्वे स्थानकात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. भारतातली पहीली डिलक्स ट्रेन असलेली डेक्कन क्वीन आज 93 वर्षांची झालीये.