मुंबई-पुणे एक्सप्रेस वे होणार आठपदरी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे होणार आठपदरी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आता आठपदरी होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आता आठपदरी होणार आहे. यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सध्या हा एक्सप्रेस वे सहा पदरी आहे. वाहनांची दिवसेंदिवस वाढ पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

या महामार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटरच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुरू आहे. एक्स्प्रेस वे हा सुमारे ९४ किलोमीटर लांबीचा असून रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव ‘एमएसआरडीसी’ने तयार केला आहे.

या संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तयार केला असून लवकरच तो राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या मार्गावरुन दररोज सुमारे दीड लाख वाहने धावत असतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com