शरद पवार आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर

शरद पवार आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज एकाच मंचावर एकत्र येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी सर्वसाधारण सभा आज मांजरी इथं पार पडणार आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहेत. दरवर्षी या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित ही सभा पार पडत असते.

या सभेसाठी सहकारमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्याच्या साखर उद्योगातील अन्य नेते देखील हजेरी लावणार आहेत. त्यामुळे जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याने काय बोलणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. 

ही सभा सकाळी 11 वाजता होणरा असून, यासाठी मुख्यमंत्री आणि शरद पवार एकत्र येणार आहेत. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे 2021-2022 या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. राज्याच्या साखर उद्योगात महत्वाची भूमिका वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट बजावत असते. याच संस्थेच्या माध्यमातून राज्यातील साखर उद्योगांना मार्गदर्शन आणि वेगवेगळे संशोधन केले जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com