ताज्या बातम्या
Pune : येरवड्यात गोडाऊनवर छापा, गुटख्याच्या तस्करीप्रकरणी आरोपीला अटक
पुण्यातील येरवडा परिसरात गुटख्याची तस्करी करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली. अमली पदार्थ विरोधी पथकाने गोडाऊनमध्ये केलेल्या छाप्यात 20 लाख 70 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.
पुण्यातील येरवडा परिसरात गुटख्याची तस्करी करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली. अमली पदार्थ विरोधी पथकाने गोडाऊनमध्ये केलेल्या छाप्यात 20 लाख 70 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. आरोपी जमनाराम उर्फ गणेश बलराम जाट (वय 25) याला अटक करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी नाईक नगरमधील गोडाऊनवर छापा मारला. आरोपी जाट ह्या गोडाऊनमध्ये गोण्यांमध्ये लपवलेला गुटखा दाखवला. येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुटखा कोणाला विक्री करणार होता आणि तो कुठून आला याचा तपास सुरू आहे.
