Pune Porsche Car Accident Update
Pune Porsche Car Accident Update

पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट! अल्पवयीन आरोपीची चौकशी होणार; बाल न्याय मंडळाने पोलिसांना दिली परवानगी

पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवून दोन जणांचा बळी घेतला होता.
Published by :

Pune Hit And Run Case : पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवून दोन जणांचा बळी घेतला होता. त्यानंतर या अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाने ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. या अपघात प्रकरणात रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. आता पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहेत. यासाठी बाल न्याय मंडळाने पोलिसांना रितसर परवानगी दिली आहे.

पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्यासाठी बाल न्याय मंडळाने पुणे पोलिसांना परवानगी दिली आहे. पोलीस उद्या अल्पवयीनची चौकशी करणार आहेत. या अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्यासाठी पोलिसांना २ तासांची वेळ देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com