Uddhav Thackeray Vs Neelam Gorhe: डॉ. निलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक
शिवसेना शिंदे गटाच्या डॉ.निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. दोन मर्सिडिज दिल्या तर पद मिळतं आशा प्रकारचे वक्तव्य केले होते. निलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिउत्तरदेखील दिले आहे. ठाकरे उत्तर देताना म्हणाले की, "आम्ही गद्दार लोकांना महत्त्व देत नाही".
अशातच आता या प्रकरणाचे अनेक पडसाद उमटले आहेत. नीलम गोह्रे यांच्या विरोधात पुण्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाले आहेत. नीलम गोह्रे यांच्या पुण्यातील घराबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केले आहे. उद्धव ठाकरें यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करणार असल्याचे आंदोलनकर्ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे ठाकरे यांच्या पक्षातील महिला शिवसैनिक करणार आंदोलनाच नेतृत्व केले आहे. दिल्लीमध्ये नीलम गोह्रे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्यात उमटताना दिसत आहेत. पुण्यात मॉडेल कॉलनी येथील नीलम गोह्रे यांच्या घराबाहेर शिवसैनिक जमले आहेत.