ताज्या बातम्या
Pune Rain Update : दौंडमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत
स्वामी चिंचोलीत पूरस्थिती, आठ ते दहा घरांमध्ये पाणी शिरले
मान्सून पूर्व पावसाने दौंड तालुक्यात जोरदार हजेरी लावल्याने पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील स्वामी चिंचोली हद्दीत मोठ्या प्रमाणावर महामार्गवर पावसाचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस,पाटस टोल प्लाझाचे पेट्रोलिंग अधिकारी आणि स्थानिकांकडून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे..मात्र या परिसरात सकाळपासून पाऊस सुरू असल्याने सेवा रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातील आठ ते दहा घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे त्या गावातील जनजीवन हे विस्कळीत झाले आहे. गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, तलाठी कार्यालय पाण्याखाली गेले आहे. गावामध्ये लाईट नसल्याने सर्वत्र अंधार पसरला आहे. ज्या घरांमध्ये पाणी गेले आहे त्या घरातील लोकांना गावातील इतर नातेवाईकांच्या घरी ठेवण्यात आले आहे.