Pune Porsche Car Accident
Pune Porsche Car Accident

मोठी बातमी! पुणे हिट अँड रन प्रकरण; आरोपी विशाल अग्रवालसह ६ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालसह इतर ६ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. त्यामुळे या सर्व आरोपींचा जामीनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Published by :

Vishal Agrawal Pune Accident Case Update : पुण्यात कल्याणी नगर परिसरात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवून दोन जणांचा बळी घेतल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणात अटक केलेले अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालसह इतर ६ जणांना पुणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. त्यामुळे या सर्व आरोपींचा जामीनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशाल अग्रवालला ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी,अशी मागणी गुन्हे शाखेकडून करण्यात आली होती. पुरावे नष्ट केल्याप्रकरणी विशाल अग्रवालवर फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला. या सर्व बाबी लक्षात घेत पुणे पोलिसांनी विशाल आणि इतर आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यासाठी न्यायालयात मागणी केली होती. परंतु, या आरोपींना आणखी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचं न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केलं.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींची नावे

1) विशाल अगरवाल ( मुलाचे वडील)

2) प्रल्हाद भुतडा ( कोझी हॉटेलचा मालक)

3) सचिन काटकर ( कोझीचा व्यवसथापक)

4) संदीप सांगळे ( ब्लॅक बारचा मालक)

5) नितेश शेवाणी

6) जयेश गावकर

( दोघेही हॉटेलचे कर्मचारी )

पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात (५ जूनपर्यंत) ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय बाल हक्क मंडळाने नुकताच दिला. या प्रकरणात अल्पवयीनचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला रिमांड होममध्ये ठेवण्याचा निर्णय घोषित करण्यात आला. संपूर्ण तपास होईपर्यंत त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अल्पवयीन अज्ञान आहे की सज्ञान याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com