ताज्या बातम्या
स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरण: आरोपी दत्ता गाडेवर आणखी 3 कलमांची वाढ
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली.
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. यावरुन आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता आरोपी दत्ता गाडे याच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. पुणे पोलिसांनी दत्ता गाडेवर आणखी 3 कलमांची वाढ केली आहे. पीडित महिलेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि दोन वेळा जबरदस्ती करणे अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांची वाढ केली आहे.
न्यायालयाने आरोपी दत्ता गाडे याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आलेली आहे.