स्वारगेट प्रकरणानंतर महिला आयोग ॲक्शन मोडवर, रुपाली चाकणकरांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Published by :
Team Lokshahi

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाले. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केले आहे. या प्रकरणामुळे आता सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. राज्य महिला आयोगदेखील आता पूर्णपणे सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. यावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

या बैठकीदरम्यान कोणते निर्णय घेण्यात आले?

बस स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र चौकशी आणि सुरक्षा हेल्प डेस्क सुरु करण्यात येणार आहे

बीट मार्शल, दामिनी पथकांची गस्त वाढणार

बस स्थानकातील बंद पडलेल्या बसेस 15 एप्रिलपर्यंत स्क्रॅपमध्ये टाकण्यात येणार

हिरकणी कक्ष अद्ययावत करणार

महिलांसाठी पिंक ऑटो रिक्षांची संख्या वाढवणार

बसेसच्या पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार

बस स्थानक परिसरात गरजेपुरताच बसेस थांबवण्यात येणार

बसस्थानक परिसर आणि बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार

तसेच टोल फ्री नंबर 112 चे फलक महिलांना दिसतील अशा भागांतच असावेत. तर शाळा कॉलेजेस मधून 1098 या टोल फ्री नंबर संदर्भात जनजागृती करण्यात यावी, अशी सुद्धा यावेळी माहिती या बैठकीत देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com