पुणे अत्याचार प्रकरणावर रोहित पवारांचा निषेध, म्हणाले, "महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..."

पुणे अत्याचार प्रकरणावर रोहित पवारांचा निषेध, म्हणाले, "महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..."

रोहित पवारांनी महिला सुरक्षेबाबत व्यक्त केली चिंता
Published by :
Team Lokshahi
Published on

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटणेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी निषेध नोंदवला आहे. यामध्ये पवार म्हणाले की, "ज्या ठिकाणी ही घटना घडली ते स्वारगेट बसस्थानक राज्यातील प्रमुख बस स्थानकांपैकी एक आहे. त्यासमोरच पोलिस स्टेशनदेखील आहे. मात्र आशा ठिकाणी एका गुन्हेगाराकडून अत्याचार करण्यात आल्याने सार्वजनिक स्थळावरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे".

पुढे त्यांनी लिहिले की, "संबंधित घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यभरात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात. इतकेच नाही तर महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असणारा शक्ती कायदा राज्यात लागू करण्याबाबत तत्काळ निर्णय होईल, ही अपेक्षा!".

दरम्यान आता रोहित पवार यांची पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून लवकरात लवकर आरोपीला शिक्षा व्हावी ही मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com