Pune Breaking: गुरूवारी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार
यंदाच्या वर्षी अर्धा पावसाळा सरण्याच्याही आधीच पाऊस चांगला झाल्यानं यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील अनेक भागांत पाण्याची टंचाई भासणार नाही. परंतु येत्या गुरूवारी पुणे शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा होणार नाही.
पाणीपुरवठा बंद असण्याचं कारण काय?
यंदा राज्यातील इतर भागांप्रमाणेच पुण्यातही मुबलक पाऊस झाला आहे. मात्र, येत्या गुरूवारी पुणे शहरातील अनेक ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जलवाहिन्यांचे काम होणार असल्यानं पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर, याच कारणाने शुक्रवारी सकाळीदेखील कमी दाबाने पाणी येणार आहे.
कोणत्या भागांत पाणीपुरवठा बंद राहणार?
पर्वती, बिबवेवाडी, सहकारनगर शिवाजीनगर, कोथरूड, सेनापती बापट रस्ता या भागांसह इतरही काही ठिकाणी पाणीपुरवठा विभागाकडून जलवाहिन्यांचे काम होणार असल्याने गुरूवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.