पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे निधन, ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे निधन, ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रकाशसिंह बादल श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री व शिरोमणी अकाली दलाच्या ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह बादल यांचे आज निधन झाले आहे. ते 95 वर्षाचे होते. प्रकाशसिंह बादल श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे निधन, ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कुणाची सुपारी घेऊन बारसू रिफायनरीला...; फडणवीसांचा मविआवर निशाणा

गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या प्रकाशसिंह बादल यांना गेल्या वर्षी जूनमध्ये गॅस्ट्र्रिटिस आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविड नंतरच्या आरोग्य तपासणीसाठी त्यांना फेब्रुवारी 2022 मध्ये मोहाली येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. बादल यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि त्यांना लुधियाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com