Sharad Pawar
Sharad Pawar Team Lokshahi

विधानसभा, जिल्हापरिषद निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

विधानसभा, जिल्हापरिषद निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभा, जिल्हापरिषद निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याची माहिती मिळत आहे. पुरंदर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. विधानसभेसोबतच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूकही स्वबळावर लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे.

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकाही एकत्र लढण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे. याशिवाय महाविकास आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी वंचित आघाडीलाही या आघाडीत घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने या दोन्ही निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे.

पुरंदर तालुका राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे की, आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. तो राष्ट्रवादीसाठी फायदेशीर ठरेल. राष्ट्रवादीला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय तरुण वर्ग राष्ट्रवादीकडे येत आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com