Bigg Boss Season 19 : नेहल चुडासमाचे अमाल मलिकवर गंभीर आरोप
Bigg Boss Season 19 : नेहल चुडासमाचे अमाल मलिकवर गंभीर आरोप; बिग बॉस 19 मध्ये वादाची लाटBigg Boss Season 19 : नेहल चुडासमाचे अमाल मलिकवर गंभीर आरोप; बिग बॉस 19 मध्ये वादाची लाट

Bigg Boss Season 19 : नेहल चुडासमाचे अमाल मलिकवर गंभीर आरोप; बिग बॉस 19 मध्ये वादाची लाट

नेहलचे गंभीर आरोप: बिग बॉस 19 मध्ये अमाल मलिकवर चुकीच्या स्पर्शाचा आरोप, घरात तणाव
Published on

बिग बॉस सिझन १९ सुरू झाल्यापासून सतत नवे वाद, भांडणं आणि चर्चेचे मुद्दे समोर येत आहेत. शोमध्ये नेहमीच कॅप्टन्सी टास्क आणि त्यातील स्पर्धा लक्ष वेधून घेतात. मात्र, नुकत्याच झालेल्या कॅप्टन्सी टास्कदरम्यान घडलेल्या एका घटनेने प्रेक्षकांना हादरवून सोडलं आहे. घरातील सदस्य नेहल चुडास्माने (Nehal Chudasama) गायक अमाल मलिकवर (Amal Malik) चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

टास्कदरम्यान वादंग

बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीसाठी विशेष टास्क आयोजित करण्यात आला होता. यात दोन टीम बनवण्यात आल्या होत्या. एका टीममधून ब्लॅकबोर्डवर लिहिणारे सदस्य निवडले गेले, तर दुसऱ्या टीममधून ते पुसणारे सदस्य निवडण्यात आले. या टास्कदरम्यान बसीर अली आणि अभिषेक बजाज यांच्यात जोरदार वाद झाला, तर दुसऱ्या गटात अमाल मलिक आणि नेहल चुडास्मा यांच्यातील खेळ वादग्रस्त ठरला. टास्कदरम्यान अमालकडून आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श झाल्याचा आरोप नेहलने केला आणि भावनिक होत ती रडताना दिसली.

अमाल मलिकची माफी

घटनेनंतर अमाल मलिकने वारंवार नेहलची माफी मागितली. त्याने आपण जाणीवपूर्वक कुठलाही चुकीचा स्पर्श केला नसल्याचं स्पष्ट केलं. तरीदेखील नेहलने इतर घरातील सदस्यांसमोर आपली तक्रार कायम ठेवली. त्यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सोशल मीडियावर नेहलवर संताप

या घटनेनंतर बिग बॉसच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली. अनेकांनी टास्कदरम्यानचा व्हिडीओ शेअर करत नेहलवर टीका केली. “अमालने खरंच काही चुकीचं केलं नव्हतं, पण नेहलने त्याच्यावर खोटा आरोप केला,” असे अनेकांनी म्हटलं. तर, काहींनी “अमालची चूक नसतानाही त्याने माफी मागितली, मात्र महिला कार्ड आणि विक्टिम कार्ड खेळण्याची ही पद्धत चुकीची आहे,” असे कडक शब्दांत मत व्यक्त केले.

प्रेक्षकांची उत्सुकता

या प्रकरणानंतर सोशल मीडियावर नेहलला जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. दुसरीकडे, अमाल मलिकला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. आता बिग बॉसचा होस्ट सलमान खान या वादावर काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com