अजित पवार शरद पवारांनाच संभ्रमात ठेवतात - राधाकृष्ण विखे पाटील
Admin

अजित पवार शरद पवारांनाच संभ्रमात ठेवतात - राधाकृष्ण विखे पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अजित पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र तरीसुद्धा या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

यातच आता राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील प्रतिक्रिया दिली आहे. सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणात लोकांना संभ्रमात ठेवणं ही त्यांची हातोटीच आहे. भविष्यात राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचं की नाही हा निर्णय पक्षपातळीवर पक्षाचे नेतेमंडळी घेतात. अजित पवार शरद पवारांनाच संभ्रमात ठेवतात असे विखे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com