Raghav Chadha : राघव चड्ढा एका दिवसासाठी बनले गिग-वर्कर; Viral Video
राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका रहस्यमय व्हिडीओमुळे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या टीझरमध्ये चढ्ढा थेट ब्लिंकिटच्या डिलिव्हरी पार्टनरच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्या या वेगळ्या प्रयोगाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
व्हिडीओमध्ये चढ्ढा आपला औपचारिक पोशाख बाजूला ठेवून डिलिव्हरी कंपनीचा गणवेश घालतात. त्यानंतर ते एका रायडरसह स्कूटरवरून ऑर्डर उचलायला जातात, इमारतीत प्रवेश करतात आणि अखेरीस ग्राहकाच्या दारापर्यंत पोहोचतात. दारावर बेल वाजवतानाच व्हिडीओ थांबतो आणि “पुढे पाहा” असा संदेश दिसतो.
या पोस्टसोबत चढ्ढा यांनी लिहिलं आहे की, त्यांनी एका दिवसासाठी सामान्य कामगाराचं आयुष्य अनुभवलं. काही काळापूर्वी त्यांनी संसदेत गिग कामगारांच्या अडचणींवर आवाज उठवला होता. त्याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम असल्याचं मानलं जात आहे. आता या अनुभवातून ते नेमकं काय सांगणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
थोडक्यात
राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांनी सोशल मीडियावर एक रहस्यमय व्हिडिओ शेअर केला.
व्हिडिओमधील टीझर चर्चेत आला आहे.
चढ्ढा ब्लिंकिटच्या डिलिव्हरी पार्टनरच्या भूमिकेत दिसत आहेत.
हा वेगळा प्रयोग सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधतो आहे.
व्हिडिओमुळे अनेकांना आश्चर्य आणि उत्सुकता वाटत आहे.

