Rahul Gandhi
Rahul Gandhi

राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर डागली तोफ, म्हणाले, "देशात महागाई, बेरोजगारी..."

धुळ्यात भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी मोदी सरकावर हल्लाबोल केलाय.

महायुती सरकारला धारेवर धरण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्र देशभरात सुरु आहे. महाराष्ट्रत नंदुरबार येथून या यात्रेला सुरुवात झाली असून राहुल गांधी मोदी सरकारवर तोफ डागत आहे. धुळ्यातही या यात्रेदरम्यान त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. देशात महागाई, बेरोजगारी, भागीदारी हे तीन महत्वाचे मुद्दे आहेत. पण मोदी सरकार यावर दुर्लक्ष करत आहे. भारतातील बड्या उद्योगपतींच्या लिस्टमध्ये दलित आदिवासी लोक मिळणार नाहीत. सरकारी यंत्रणा आणि खासगी यंत्रणांवरही त्यांचाच दबाव आहे. दिल्लीचं सरकार ९० लोक चालवतात. अग्नीवीर होणार की नाही, तेच ठरवतात. पण दलित, आदिवासी लोकांना अग्नीवीरमधून बाहेर काढलं जाईल. याला फक्त पंतप्रधान मोदी, त्यांचे करोडपती सहकारी आणि देशातील ३ टक्के लोक जबाबदार आहेत, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. ते धुळ्यात भारत जोडो यात्रेत बोलत होते.

राहुल गांधी धुळ्यात जनतेला संबोधीत करताना म्हणाले, मी चार हजार किमी चाललो आहे. देशात महागाई, बेरोजगारी आणि भागीदारी हे तीन मुद्दे महत्त्वाचं असल्याचं माझ्या निदर्शनात आलं. भारताच्या बड्या उद्योगपतींच्या यादीत तुम्हाला दलित आदिवासी लोक मिळणार नाहीत. सरकारी सिस्टम, कॉर्पोरेटर सिस्टमही सरकारच्या इशाऱ्यावर चालवलं जातंय. दिल्लीचं सरकार ९० लोक चालवतात. अग्नीवीर होणार की नाही, तेच ठरवतात. १०० रपयांच्या बजेटमध्ये आदिवासींना आणि दलितांना १० रुपयेच मिळतात, असं म्हणत गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं.

काँग्रेसच्या कार्यकर्त्याला जवळ बोलावून त्याला इशारा करत राहुल म्हणाले, मोदी समुद्राजवळ आहेत. पाठीमागून अदानी येणार आणि तुमच्या खिशाला कात्री लावणार. मोदी तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करणार, शहा ईडी सीबीआयच्या माध्यमातून तुमच्यावर कारवाई करणार, तुम्ही काही केलं तर पोलीस कारवाई करणार, आणि अदानी अंबानी याचा आनंद लुटणार. तुम्ही मोबाईलवर रील बघता याचे पैसे जिओला जातात. 'जिओ' और आप लोग मरो, असं म्हणत राहुल गांधी यांनी नाव न घेता अंबानी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. २२ टक्के लोकांसाठी नरेंद्र मोदी कोट्यावधी रुपये माफ करत असतील, तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ का केलं जात नाही, असा सवालही गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com