पंतप्रधानांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी - राहुल गांधी

पंतप्रधानांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी - राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या आई हिराबेन मोदी ( Heeraben Modi ) यांचं निधन झालं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या आई हिराबेन मोदी ( Heeraben Modi ) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या निधनाची माहिती ट्विट करत दिली आहे.

त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मोदी कुटंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असं ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधानांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी - राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी अनंतात विलीन; मोदींनी दिला पार्थिवाला खांदा

हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी हिराबेन यांना यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये रुग्णालयात येऊन आईची विचारपूस केली होती. हिराबेन यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांच्यावर उपचार सुरु असताना निधन झालं.

पंतप्रधानांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी - राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आईसोबत नातं कसं होतं? पाहा फोटो…
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com