ताज्या बातम्या
Rahul Gandhi : "एकीकडे महात्मा गांधी, तर दुसरीकडे नथुराम गोडसे, दोन विचारधारांमध्ये युद्ध - राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी कार्यक्रमात संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, एकीकडे नथुराम गोडसेची विचारधारा आहे, तर दुसरीकडे महात्मा गांधींची विचारधारा आहे. महात्मा गांधींच्या विचारसरणीनं आम्ही पुढे जात आहोत.एकीकडे तुमच्याकडे महात्मा गांधी आहेत आणि दुसरीकडे नथुराम गोडसे.
तसेच भारतात दोन प्रकारच्या विचारधारा आहेत. ज्यात एकीकडे नथुराम गोडसेची विचारधारा आहे, तर दुसरीकडे महात्मा गांधींची विचारधारा आहे. जर दोन विचारधारांमध्ये युद्ध होत असेल, एक ज्या विचारधारेचं प्रतिनिधीत्व आम्ही करतोय आणि दुसरी ज्याचं प्रतिनिधीत्त्व भाजप आणि आरएसएस करतंय. असे राहुल गांधी म्हणाले.