ताज्या बातम्या
मुस्लिम लीग हा पूर्णपणे सेक्युलर पक्ष; राहुल गांधींचे वक्तव्य
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदी सरकारवर तो जोरदार निशाणा साधत आहेत. त्यावेळी त्यांनी वॉशिंग्टन डीसी येथे नॅशनल प्रेस क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती.
यावेळी राहुल गांधी यांना केरळ येथील मुस्लिम लीगसोबतच्या युतीविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत राहुल गांधी म्हणाले की, मुस्लिम लीग हा पूर्णपणे सेक्युलर पक्ष आहे. यांच्या या वक्तव्यावरुन आता देशातील राजकीय वातवरण चांगलेच तापले आहे.