Rahul Gandhi
Rahul Gandhi

रामलीला मैदानात राहुल गांधींची तोफ धडाडली, म्हणाले,"'EVM'शिवाय भाजप २०० पार..."

दिल्लीच्या रामलीला मैदानात इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष मोदी सरकारविरोधात एकवटले आहेत. राहुल गांधी यांनी मोदी सरकावर निशाणा साधत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
Published by :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानात इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष मोदी सरकारविरोधात एकवटले आहेत. राहुल गांधी यांनी मोदी सरकावर निशाणा साधत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. भारताचे तीन-चार अरबपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मॅच फिक्सिंग केली जात आहे. संविधानाला खेचण्यासाठी ही मॅच फिक्सिंग केली जात आहे. हे संविधान संपल्यावर हिंदुस्थान वाचणार नाही. पोलिसांच्या धमक्यांनी संविधान वाचवलं जाऊ शकत नाही. पोलिस, सीबीआय, ईडीचा गैरवापर वापर करुन हे देश चालवत आहेत. तुम्ही मीडियाला खरेदी करु शकता. मीडियावर दबाव टाकू शकता, पण तुम्ही हिंदुस्थानच्या आवाजाला थांबवू शकत नाही. ही लढाई संविधानाला वाचवण्याची लढाई आहे. ईव्हीएमशिवाय भाजप २०० पार सुद्धा जाणार नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे.

राहुल गांधी म्हणाले, इंडिया आघाडीतील कार्यकर्त्यांचा स्वागत करतो. आता आयपीएलचे सामने सुरु आहेत. मॅच फिक्सिंग शब्द तुम्ही ऐकलाय का? बेईमानी करून कर्णधार खेळाडूला खरेदी करून सामना जिंकतात. क्रिकेटमध्ये याला मॅच फिक्सिंग म्हणतात. नरेंद्र मोदी यांनी अंपायर निवडले आहेत. आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करुन तुरुंगात टाकलं. या निवडणुकीत नरेंद्र मोदी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस पार्टी सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. आमचे सर्व बँक खाते बंद करण्यात आले आहेत. आम्हाल चळवळ सुरु करायची आहे, लोकापर्यंत पोहोचवायचं पण सत्ताधाऱ्यांनी आमचे खाते बंद केले आहेत. नेत्यांना जेलमध्ये टाकलं जातं.

केजरीवाल, सोरेन यांना अटक करतात. गरिबांचा पैसा, शेतकऱ्यांचा पैसा पाच-सहा लोकांच्या हातात जाईल. नोटबंदी केली, जीएसटी सुरु केली, याचा फायदा कोणालाच झाला नाही. २२ लोकांकडे जेव्हढा पैसा आहे, तेव्हढाच पैसा ७२ टक्के लोकांकडे आहे. तुम्ही यांना मत दिलं नाही, तर यांची मॅच फिक्सिंग यशस्वी होणार नाही. जर यांची मॅच फिक्सिंग यशस्वी झाली, तर संविधान संपून जाईल. ही निवडणूक सर्वसाधारण निवडणूक नाही. ही निवडणूक संविधान वाचवण्यासाठी, भारताला वाचवण्यासाठी, शेतकरी, गरीबांचे हक्क वाचवण्याची निवडणूक आहे. ही मॅच फिक्सिंग केली जात आहे, संपूर्ण देशाला दिसत आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com