राहुल गांधी लवकरच 'मातोश्री'वर येण्याची शक्यता
Admin

राहुल गांधी लवकरच 'मातोश्री'वर येण्याची शक्यता

राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट होण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

या भेटीदरम्यान सावरकर वाद आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट असणार आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मुंबईत येणार आहेत.

जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांची नुकतीच राहुल गांधींसोबत भेट झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली होती. आता उद्धव ठाकरें आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com