महाविकास आघाडीच्या सभेच्या टीझरमधून राहुल गांधींना वगळलं
Admin

महाविकास आघाडीच्या सभेच्या टीझरमधून राहुल गांधींना वगळलं

महाविकास आघाडीच्या सभेचा टीझरमधून राहु गांधींना वगळण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महाविकास आघाडीच्या सभेचा टीझरमधून राहु गांधींना वगळण्यात आले आहे. 2 एप्रिल रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या एकत्र सभेचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. 'वज्रमूठ महाविकास आघाडीची' असा महाविकास आघाडीचा टीझर जारी करण्यात आला आहे.

औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर महाविकास आघाडीची पहिली सभा होत आहे.महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्ररित्या 10 जूनपर्यंत महाविकास आघाडीच्या सभा एकत्र घेण्याचा निर्णय झालेला आहे.

महाविकास आघाडीची पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, फोटो आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार आणि नाना पटोले आहेत. मात्र यात राहुल गांधी दिसत नाही आहेत. यामध्ये राहुल गांधींना स्थान न देता सोनिया गांधींची दृश्यं लावण्यात आली आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com