Ramdas Athawale on Rahul Gandhi
Ramdas Athawale on Rahul Gandhi

Ramdas Athawale On Rahul : राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची संधी मिळणार नाही - रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान होण्याची संधी कधीच मिळणार नाही...
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान होण्याची संधी कधीच मिळणार नाही, असे रामदास आठवले म्हणाले. 2004 मध्ये संधी मिळाली तेव्हा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाने त्यांना पंतप्रधान होऊ दिले नाही, असे ते म्हणाले. आता वेळ निघून गेली आहे, आता त्यांना ही संधी मिळणार नाही.

आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा वेगाने पुढे जात आहे. त्यांची जागा राहुल गांधी घेऊ शकणार नाहीत. 2024 मध्ये NDA 400 च्या वर जागा जिंकत असेल तर राहुल पंतप्रधान कसे होतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 पेक्षा जास्त जागा मिळणार नसल्याचे आठवले म्हणाले.

Ramdas Athawale on Rahul Gandhi
Mega Block : मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, जाणून घ्या काय आहे वेळापत्रक?

दरम्यान भारत जोडो यात्रा शनिवारी दिल्लीत पोहोचली आहे. 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांचा समावेश झाला आहे. भारत जोडो यात्रेचे शनिवारी दिल्लीत आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com