Rahul Gandhi Tweet : शिवरायांच्या जयंतीदिनी राहुल गांधींकडून श्रद्धांजलीचं ट्विट, शिवप्रेमींचा संताप

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिली, शिवप्रेमींचा संताप उफाळला
Published by :
Prachi Nate

आज १९ फेब्रुवारीला सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार सर्वत्र साजरी केली जात आहे. राज्यभरात सर्वांकडून महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा आणि सोहळे साजरी केले जात आहेत. राजकीयवर्तुळातून देखील महाराजांना अभिवादन केल जात आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे.

राहुल गांधींच्या एक्स सोशल मीडियावरील पोस्टवरून मोठ्या वादाची शक्यता वर्तावली जात आहे. राहुल गांधींच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. शिवजयंती दिनी अभिवादन करण्याऐवजी श्रद्धांजली वाहिल्याने राहुल गांधींच्या पोस्टवर राजकीय वर्तुळातून देखील टीकेची झोड करण्यात येत आहे.

राहुल गांधींच ट्वीट काय?

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.

त्यांच्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली.

त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com