सुप्रीम कोर्टाने शिंदेंविरोधात निर्णय दिला तरीही शिंदे मुख्यमंत्री...; राहुल नार्वेकरांनी केलं सूचक विधान
Admin

सुप्रीम कोर्टाने शिंदेंविरोधात निर्णय दिला तरीही शिंदे मुख्यमंत्री...; राहुल नार्वेकरांनी केलं सूचक विधान

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Published on

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज गुरुवारी लोकशाही संवाद कार्यक्रम मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडत आहे.

या कार्यक्रमाला राहुल नार्वेकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, सरकारचं अस्तिव धोक्यात येऊ शकते का?

यावर उत्तर देत राहुल नार्वेकर म्हणाले की, हे सरकार बहुमतामध्ये आहे. सगळ्या गोष्टींचा विचार करुन निर्णय घ्यावा लागेल. आजच्या परिस्थिती या सरकारकडे संपूर्ण बहुमत आहे. या सरकारने आपले बहुमत सभागृहात सिद्ध केलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बहुमत नाही आहे असा विचार करालया हवा. असे नार्वेकर म्हणाले.

पुढे त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, ज्यांच्यावर ही टांगती तलवार आहे. त्यात मुख्यमंत्री स्वत: आहेत. त्यावर उत्तर देताना नार्वेकर म्हणाले की, त्यात मुख्यमंत्री असतील किंवा इतर आमदार असतील तरी कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसलं तरी सहा महिने एखादी व्यक्ती जसे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली त्यावेळी ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. असे अनेकजण होते. सुप्रीम कोर्टाने शिंदेंविरोधात निर्णय दिला शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला धोका नाही असे नार्वेकर म्हणाले.

सुप्रीम कोर्टाने शिंदेंविरोधात निर्णय दिला तरीही शिंदे मुख्यमंत्री...; राहुल नार्वेकरांनी केलं सूचक विधान
LOKशाही संवाद : पडद्याआड जे घडते ते पडद्याबाहेर बोलता येत नाही; असे राहुल नार्वेकर का म्हणाले?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com