Rahul Narwekar : आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण त्यांचा पाहुणचार नेहमीच करतो

Rahul Narwekar : आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण त्यांचा पाहुणचार नेहमीच करतो

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.

  • तीन वर्षानंतर झालेल्या या भेटीत नार्वेकर आणि ठाकरेंमध्ये 'कॉफी पे चर्चा'

  • राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिट चर्चा झाली. मात्र नेमकी कशावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही आहे. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, अनिल परब देखील उपस्थिती होते. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यासोबतच उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.

ठाकरे-फडणवीस आणि ठाकरे नार्वेकर भेटीमध्ये विरोधी पक्षनेतेपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती मिळत असून तीन वर्षानंतर झालेल्या या भेटीत नार्वेकर आणि ठाकरेंमध्ये 'कॉफी पे चर्चा' झाल्याचे पाहायला मिळाले.

याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत राहुल नार्वेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे साहेब हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ गटनेते आहेत. त्या अनुषंगाने ते अध्यक्षांच्या भेटीसाठी आलेले. ही सदिच्छा भेट होती. आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण त्यांचा पाहुणचार नेहमीच करतो. त्यामुळे त्यात नवल काहीच नाही आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com