ताज्या बातम्या
Rahul Solapurkar : अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता अभिनेता राहुल सोलापूरकर याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत देखील आता वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता अभिनेता राहुल सोलापूरकर याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत देखील आता वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
राहुल सोलापूरकर म्हणाला की, वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे ब्राह्मण ठरतात, असं वक्तव्य केलं आहे. आता या नव्या वक्तव्यामुळे सोलापूरकर याने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. त्यामुळे मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
या वक्तव्यामुळे अभिनेता राहुल सोलापूरकरवर चांगलीच टीका करण्यात येत आहे. यावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत.