राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर; विखे पाटलांना मोठा धक्का, प्राजक्त तनपुरे विजयी
Admin

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर; विखे पाटलांना मोठा धक्का, प्राजक्त तनपुरे विजयी

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. यात विखे पाटलांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा विजय झाला आहे.

या निवडणुकीत तनपुरे गटाचा दणदणीत विजय झालाय. तनपुरे गटाने 18 पैकी तब्बल 16 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत या लढतीत भाजप खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्यात हा सामना होता. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा दणदणीत विजय झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com