Raigad Abenali Ghat Land Slide
Raigad Abenali Ghat Land Slide

Ambenali Ghat Landslide : आंबेनळी घाटात दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

आंबेनळी घाटाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करा; रायगड पोलिसांचे अवाहन
Published by  :
Pankaj Prabhakar Rane

भारत गोरेगावकार : रायगड | मान्सून राज्यात दाखल झाला आहे. दोन दिवसांतच मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना देखील घडत आहे. त्यातच आता आंबेनळी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; पोलादपूरकडुन महाबळेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या आंबेनळी घाटात ही दरड कोसळली (Landslide) आहे. या दरडीमुळे दोन्ही बाजूला वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरडी काढण्याचे काम सुरू आहे त्यामुळ दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.तसेच आंबेनळी घाटाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करा असे अवाहन रायगड पोलिसांकडून (Police)करण्यात आले आहे. आंबेनळी घाटात दोन दिवसांपासून दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे या घाटातील वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेतल्या जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com