Budget 2024 : रेल्वेत तीन नवीन आर्थिक कॉरिडॉर बांधले जाणार; 40 हजार सामान्य बोगी वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जाणार

Budget 2024 : रेल्वेत तीन नवीन आर्थिक कॉरिडॉर बांधले जाणार; 40 हजार सामान्य बोगी वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जाणार

आज अर्थसंकल्प सादर करण्यात आले.
Published by :
Siddhi Naringrekar

आज अर्थसंकल्प सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे अखेरचे हे अधिवेशन होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण या अर्थसंकल्पानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.

अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यावेळी रेल्वेसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेवर सर्वाधिक भर देण्यात आलेला पाहायला मिळत आहे.

3 नवीन रेल्वे इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधले जाणार असून हे कॉरिडॉर ऊर्जा, खनिजे आणि सिमेंटसाठी असतील. 40 हजार सामान्य रेल्वे बोगी वंदे भारत मानकात रूपांतरित केल्या जातील. यामुळे गाड्यांमधील प्रवास सुरक्षित होईल आणि पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com