Mega Block
Mega BlockTeam Lokshahi

मुंबईकरांसाठी महत्वाचे; मध्य, हार्बर मार्गांवर उद्या असणार मेगाब्लॉक

मध्य रेल्वेने रविवारी (6 नोव्हेंबर) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घोषित केला आहे.
Published by :
Sagar Pradhan

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विद्याविहार दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3. 55 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. परिणामी मेगाब्लॉकमुळे काही मार्गावरील लोकल उशिराने धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेले मुंबई विभाग रविवार दि. 06.11.2022 रोजीच्या मेगा ब्लॉकचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असणार आहेत.

Mega Block
उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला; म्हणाले, शिवसेनेच्या नावावर तोतयागिरी...

त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानक दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. पुढे डाऊन धिम्या मार्गावरुन जातील.

मध्य रेल्वेवरील घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 या वेळेत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या स्थानक दरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील. तर पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 पर्यंत सुटणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल / बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

विशेष लोकलच्या फेऱ्या होणार

पनवेल – वाशी अप आणि डीएन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत (बेलापूर/नेरूळ – खारकोपर सेवा प्रभावित होणार नाहीत) सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेलहून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com