Railway News: वर्षअखेरीस रेल्वे स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनासाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर निर्बंध

Railway News: वर्षअखेरीस रेल्वे स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनासाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर निर्बंध

वर्षअखेरीस रेल्वे स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनासाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर निर्बंध. 29 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 पर्यंत मुंबईतील काही प्रमुख स्थानकांवर लागू.
Published by :
Prachi Nate
Published on

2024 संपून नववर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत असं असताना वर्षअखेरीस प्रमुख रेल्वे स्थानकांवर मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची दाट शक्यता दर्शविली जात आहे. यासाठी मुंबईतील काही मुख्य रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रिीवर तात्पुरते निर्बंध लावले गेले आहेत.

निर्बंधचे मुख्य कारण तर कधीपर्यंत असणार निर्बंध

प्लॅटफॉर्मवर होणान्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निर्बंधचे मुख्य कारण आहे. तर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निर्बंध 29 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 ला रात्री 12 वाजेपर्यंत लागू असतील.

वर्षअखेरीच्या कालावधीत सुरळीत व सुरक्षित प्रवास अनुभवासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे ही विनंती करण्यात येत आहे. वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही, अशांचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूने सदर निर्बंधांमधून सूट देण्यात येत आहे.

कोणत्या स्थानकांवर लागू शकते निर्बंध

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुर्गी आणि लातूर या स्थानकांवर हे निर्बंध लागू असतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com